नगर : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पक्षासाठी एकनिष्ठतेने कामकाज केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची मोर्चे बांधणी झाली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतभाजपाला यश मिळवायचे असेल तर पुन्हा भानुदास बेरड यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी द्यावी अशी मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.
भाजप अंतर्गत सध्या वाद-विवाद सुरू आहेत. वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याचे उघड झाले आहे. या वादविवादामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. परिणामी पक्ष संघटन मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्षांनी पक्ष संघटनासाठी केलेले प्रयत्न कमी पडत आहे.
भानदास बेरड यांनी जिल्हाध्यक्ष असताना पक्ष संघटन मजबूत केले होते. शिवाय एकमेकांमध्ये असलेले मतभेद दूर करून सर्वांना एक दिलाने काम करण्यास प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे त्यावेळी भाजप कार्यकर्ते एक दिलाने कामकाज करीत होते.
बेरड यांना आता संधी दिल्यास आता जिल्ह्यात भाजपाची कमी झालेली ताकद वाढविण्यास मदत होणार असून पक्ष संघटन मजबूत होऊन सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात जोडले जाणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे पक्षाने बेरड यांच्या नावाचा विचार करावा, अशी अपेक्षा आता कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष पदाच्या संधी बरोबरच बेरड यांना आगामी विधानसभा निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी होत आहे. या मागणीचात्यांनी गांभीर्याने विचार करून बेरड यांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. बेरड जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले एकमेकातील हेवेदावे कमी होतील.

Post a Comment