कर्जत बाजार समितीवर रोहित पवार गटाचा झेंडा फडकणार.

कर्जत : कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत आमदार रोहित पवार गटाचा झेंडा फडकणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. सभापती पद रोहित पवार यांच्या गटाला तर उपसभापतीपद आमदार राम शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व राम शिंदे यांच्या गटाला समसमान नऊ जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे सभापती व उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटानेद्रोपतीपद आपल्याकडेच राहील असा दावाही केलेला आहे.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही रोहित पवार व राम शिंदे गटाला समसमान जागा मिळाल्या होत्या. या बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत समसमान जागा असल्यामुळे ईश्वरी चिठ्ठीने सभापती निवड करण्यात आली.  यामध्ये राम शिंदे यांच्या गटाला सभापती पद मिळाले आहे. 

उपसभापती पद आमदार रोहित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. त्यामुळे कर्जत बाजार समितीचे सभापती व उपसभापती निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत ईश्वरी चिठ्ठी राम शिंदे गटाची निघाली तशीच  चिठ्ठी कर्जत मध्येरोहित पवार गटाची निघणार आहेव उपसभापती पदराम शिंदे गटाला मिळणार आहे. 

दरम्यान कर्जत बाजार समितीच्या दोन जागेच्या फेर मतमोजणीनंतर आमदार राम शिंदे यांच्या कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल व आमदार रोहित पवार यांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या समसमान 9-9 जागा कायम राहिल्या. फेर मतमोजणीत कोणताही बदल घडला नाही.

फेरमतमोजणीत परिस्थिती जैसे थे राहत याउलट आक्षेप घेतलेल्या भरत पावणे आणि लीलावती जामदार यांचे एक मत कमी झाले. महिला राखीवमध्ये  मतमोजणीत अवैध मतांची संख्या 4 होती आजच्या फेर मतमोजणीत 6 झाली. यामुळे सुवर्णा कळसकर व लीलावती जामदार यांच्या मतांमध्ये अवघे दोन मतांचा फरक पडल्याने कळसकर दोन मतांनी विजयी ठरल्या.

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या लढतीत आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला समसमान 9-9 जागा मिळाल्या होत्या. भाजपाचे उमेदवार भरत पावणे आणि लीलावती जामदार यांनी  29 एप्रिलच्या मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने आज सेवा सोसायटीच्या 9 जागेसाठी फेर मतमोजणी पार पडली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post