नियोजित मंडळ अधिकारी कार्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटविले.... सरपंच बंटी उबाळेंचा पुढाकार.....


श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव येथे नव्याने मंजूर झालेल्या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या नियोजित शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते हे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. यासाठी सरपंच बंटी उबाळे यांनी पुढाकार घेतल्यामुळेच माजी उपसरपंच विजय वाकडे यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात प्रशासनाला यश मिळाले. 


तालुक्यात नेहमीच चर्चेत असणारे पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून आढळगाव ची ओळख आहे. सध्या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून गावाच्या सोईसाठी नव्याने मंडळ अधिकारी कार्यालय  मंजूर झाले आहे नवीन अधिकार्याची  नेमणूक ही झाली आहे. 

त्याचबरोबर नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४०लाखाचा निधी ही मंजूर असताना शासनाच्या जागेवर माजी उपसरपंच विजय वाकडे यांनी अतिक्रमण केल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. पण सरपंच बंटी उबाळे यांनी हा प्रश्न अतिशय नियोजन बध्द हाताळून आज पोलिस बंदोबस्तात शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवले असल्यामुळे आता आढळगाव मध्ये मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू होण्यास अडथळा राहिला नाही. 

आज हे अतिक्रमण काढण्यासाठी मंडळ अधिकारी झावरे. कामगार तलाठी प्रकाश कांबळे,प लीस बीट अंमलदार गुलाब मोरे. पोलीस किरण जाधव. ग्रामविकास अधिकारी कारभारी जाधव उपस्थित होते

आढळगाव हे सुसंस्कृत गाव आहे मला या गावचा सरपंच बनुन गावचा विकास करण्याची संधी भेटली हे माझे भाग्य पण गावच्या विकासासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींशी कधीही तडजोड करणार नाही या अतिक्रमित जागेवर भव्य असे मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय होणार असून प्रजन्यमापक यंत्रही  बसविण्यात येणार आहे याच जागेवर सर्व गोष्टी होणार असून कोणी कितीही विरोध केला तरी मी गावच्या विकासासाठी कोणाबरोबर ही तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया सरपंच बंटी उबाळे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post