अमर छत्तीसे
श्रीगोंदा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विरोधातील तक्रारीचा आमदार राम शिंदे व आमदार बबनराव पाचपुते हे वाचणार असल्याची चर्चा सुरु आहे.
खा. विखे यांची गेल्या काही महिन्यातील श्रीगोंद्यासह कर्जत जामखेड तालुक्यातील भूमिका ही पक्षाच्या विरोधात असल्याच्या तक्रारी दोन्ही आमदारांनी केल्या. त्यावर पक्षाने अद्याप तोच काही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने तक्रारी होण्याची शक्यता आहे.
आमदार राम शिंदे व आमदार बबनराव पाचपुते यांनी खासदार सुजय विखे नियमित पक्ष विरोधी काम करीत असल्याची तक्रार केली आहे. विखे यांच्या पक्षविरोधी कारवाईमुळे नेहमीच स्थानिक नेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम पक्ष बांधणीवर होत आहे.
जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत होण्याऐवजी कमकुवत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी होत चालली आहे. विखेंकडून नेहमीच विरोधी पक्षांना भाजप पक्ष वाढवण्याऐवजी ते विरोधी पक्ष वाढवत आहेत.
कर्जत -जामखेड व व नगर शहरातील या दोन आमदारांना नेहमीच विखे यांचे सहकार्य असते. विखे नगर शहरातील प्रत्येक कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांना बरोबर घेऊनच कामकाज करीत आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.
विखे यांच्यासमोर नाराजी व्यक्त करू नये त्यात काडीमात्र बदल झालेला नाही. तो होईल की नाही यातही शंका व्यक्त केली जात आहे. विखे यांच्या या धोरणाचा पक्षाला फटका बसत आहे.
यावर सर्व बाबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्ह्यातील कार्यकर्ते मांडणार आहेत. तसेच आमदार राम शिंदे व आमदार बबनराव पाचपुते ही विखे यांच्याबाबत तक्रार करणार आहेत.यावर फडणवीस काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment