पठारवाडीत स्री शक्तीचा सन्मान... राजमाता "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार" २०२३....


पारनेर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने  समाजिक, शैक्षणिक,आरोग्य व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन नियमा नुसार गावातील दोन कर्तुत्वान महिलांचा ग्रामपंचायत स्तरीय  "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार" प्रदान करण्यात आला.

पठारवाडी ग्रामपंचायतीत  या पुरस्कार वितरण सोहळ्या वेळी उपस्थित सरपंच उर्मिलाताई भास्करराव सुपेकर, उपसरपंच दौलतराव सुपेकर  मा.उपसरपंच मारुती आनंदा पठारे, मा.सरपंच भास्करराव सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य, भिकाशेठ पठारे, ग्रा.सदस्य शंकरराव पठारे, ग्रा.सदस्य मछिंद्र पठारे, बालाजी डेअरी चेअरमन श्री.बबनराव पवार, (शंभूराजे इलेक्ट्रिकलचे संचालक) युवा नेते मोहनशेठ पवार, युवा नेते कुंडलिकराव पठारे, ग्रामसेवक देंडगे भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी येलप्पा तेलंग, सोमनाथ गिरी आदी उपस्थित होते.


यामध्ये अंगणवाडी सेविका सौ.कविता रमेश तांबे व सौ.सिमा विठ्ठल तांबे यांना सन्मानचिन्ह,पुरस्कार रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.


सामाजिक कार्यामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल अंगणवाडी मदतनीस सौ.निशाद मनियार,सौ.विजया रासकर,अंगणवाडी सेविका सौ.संगीता बोदगे, आरोग्य सेविका सुनिता लाहीगुडे, महिला बचत गट प्रतिनिधी अनिता केदारी यांचाही ग्रामपंचायत कार्यालयकडून सन्मान करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post