राहुरी : शिर्डी येथे हायप्रोफाईल देह व्यापार चालत असलेल्या ६ लॉजवर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी छापा टाकत मोठी कारवाई केली होती. यातील एका हॉटेल / लॉजचे मालक असलेल्या राहुरी येथील एका प्रतिष्ठित महिलेस शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
तिला राहाता न्यायाल्यात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. संबंधितांनी हॉटेल व लॉज करारने दिले असल्याचे समजते.
पाच मे रोजी शिर्डी शहरात एकाच वेळी ६ लॉजवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक झाली होती. अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने मोठ्या पोलिस फौज फाट्यासह मोठी कारवाई झाली. यामध्ये १ अल्पवयीन विदेशी मुलगीची देखील सुटका करण्यात आली.
सदर तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या कडे आला असता त्यांनी देहव्यापार चालणाऱ्या हॉटेल /लॉज मालकांवर पिटा व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होत अधिक चौकशी अंती हॉटेल मालकांच्या विरोधात ११ मे रोजी उशीरा गुन्हा दाखल केला.
तीन हॉटेल मालकांना अटक झाली होती तर आणखी तीन पैकी एक हॉटेल /लॉज मालक महिला राहुरीतील असल्याने त्यांना आज रोजी पोलिसांनी चौकशीला बोलावले असता चौकशी केल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता १५ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळी स्वतःच्या फायद्यासाठी अवैध धंदे करणाऱ्यांवर मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडालेली आहे.राहुरीतील मालक असलेल्या महिलेने आपले हॉटेल/लॉज राहाता तालुक्यातील एका व्यक्तीस करारनामा करत चालविण्यास दिले होते असे असतानाही पोलिसांनी करारनामा नावे असलेल्या व्यक्ती ऐवजी मूळ हॉटेल मालकावर कारवाई केली आहे.

Post a Comment