अमर छत्तीसे
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईमध्ये पक्षाची बैठक झाली. या बैठकीत नगर दक्षिणच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनशाम शेलार यांच्या नावावर चर्चा झाली आहे. त्यामुळे कार्यकर्तयांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदार संघावर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसची आज सव्वा अकरा वाजता मुंबई येथे पार्टी कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक होती. यामध्ये काही संभाव्य उमेदवरांच्या नावाची चर्चा करण्यात आलेली आहे.
या बैठकीला खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील, अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, निरीक्षक माजी महापौर अंकुश काकडे, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत उमेदवारी बाबत चर्चा झाली. या चर्चेत सर्व सामन्यात चांगली प्रतिमा व दांडगा लोकसंपर्क या जोरावर घनश्याम यांना पक्ष उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत आहे. मागील विधनासभा निवडणुकीत शेलारांचा निसटता पराभव झाला होता. सुद्धा शेलार यांनी मतदार संघात संपर्क कायम ठेवला आहे.
प्रत्येक गावात हक्काचा कार्यकर्ता असणारे शेलार आहेत. त्याचबरोबर अतिशय स्पष्ट वक्ता अशी ओळख तसेच संघर्ष करणारे व्यक्तिमत्व म्हणून शेलार यांची ओळख आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी मतदारसंघात संवाद यात्रा काढून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व सोडविण्यासाठी प्रयत्न ही केले.
त्याचबरोबर शेलार यांना संपर्क साधण्यासाठी कोणत्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नसते. या सर्व बाबी पक्षाकडे असल्यामुळेच आजच्या बैठकीत उमेदवारीबाबत चर्चा झाली आहे. शेलार यांच्या नावाची चर्चा झाल्यामुळे तालुक्यतील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेेले आहेत.
शेलार लोकसभेत जाणार असल्याने माजी आमदार राहुल जगताप यांचा रस्ता मोकळा झाला आहे. राहुल जगताप यांचे समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.


Post a Comment