अमर छत्तीसे
श्रीगोंदा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याऐवजी श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदार संघावर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसची मुंबई येथे पार्टी कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक होती. यामध्ये काही संभाव्य उमेदवरांच्या नावाची चर्चा करण्यात आलेली आहे.
या बैठकीला खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील, अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ, निरीक्षक माजी महापौर अंकुश काकडे, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी आदी उपस्थित होते.
बैठकीत दक्षिण लोकसभा मतदारसंघातून घनश्याम शेलार यांनी उमेदवारी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इतरही जिल्ह्यातील नेत्यांची नावे चर्चेत आलेली आहे. घनश्याम शेलार यांनीच ज्येष्ठ नेत्यांची अपेक्षा आहे.
यावर श्रीगोंदे नगरमतदारसंघात मात्र जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. घनश्याम शेलार यांनी लोकसभा ऐवजी विधानसभेची निवडणूक लढावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. शेलार यांनी श्रीगोंदेतून निवडणूक लढले त्याचा फायदा लोकसभेसाठी निलेश लंके हे त्यांनाचउमेदवारी करण्याची संधी मिळून द्यावी अशी अपेक्षा आहे.
त्यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे. कोविड काळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाचात्यांना या निवडणुकीत नक्कीच होईल असे मत घनश्याम शेलार यांचे समर्थक व्यक्त करत आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील एक शिष्टमंडळ लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे याबाबत शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील बैठकीत यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर काही नाही समाज माध्यमावर पोस्ट टाकून असे होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. अण्णा यांनी लोकसभा ऐवजी विधानसभा लढावीव्यक्त होऊ लागले आहे.

Post a Comment