पिक विम्याचे पैसे सरकार भरणार....

जामखेड : राज्य सरकारने पीक विम्याचे पैसे भरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याला वर्षाला १२ हजार रुपये मिळतील, अशा प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंती कार्यक्रम चौंडी (ता. जामखेड) येथे उत्साहात पार पडला. 

या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुरेश धस, भीमराव धोंडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  पिक विमा चे पैसे राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

शिंदे म्हणाले की आपले सरकार हिंदुत्त्ववादी आहे. त्यामुळे अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा ऐतिहासिक सोहळा आहे. त्याचे साक्षीदार मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहोत. अहिल्यादेवी नगर हे नाव देण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, याचा अभिमान वाटतो. अहिल्यादेवी होळकरांचे नाव मिळाल्याने या जिल्ह्याचे नाव हिमालयासारखे मोठे होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post