आढळगावच्या विकास कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींची भाडळी बाहेर काढणार....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव हे सर्वात मोठे गाव आहे. या गावात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहे. काही कामाबाबत खोट्या तक्रारी करुन  अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची "भाडळी" बाहेर काढणार असल्याचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी सांगितले. 


आढळगाव येथे जल जीवन योजनेअंतर्गत काम चालू आहे. हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असताना काही विघ्नसंतोषी लोक गावच्या विकास कामात अडथळा निर्माण करत आहेत. 

या तक्रारखोर लोकांची लवकरच पोल खोल करणार आहे. जल जीवनचे काम जर चुकीचे चालू असताना नागरिकांना जर जाणवले तर नक्कीच तक्रार करावी पण हे काम करताना ठेकेदारांना आर्थिक मागणी करत आहेत, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. 

गावचा विकास हेच माझे ध्येय आहे. विकास कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मी स्वतः १२ रोजी उपोषण करणार असल्याचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post