नगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या जुलै महिन्यांत आंतरजिल्हा बदल्यांची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदल्यांबाबत नवीन शासन निर्णय काढला असून त्यानुसार जुलै महिन्यात आंतरजिल्हा बदल्यांची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी श्रेणी दोन, विस्तार अधिकारी श्रेणी तीन यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच होणार असून या प्रवर्गातील 205 जणांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील महिन्यांत जिल्हातंर्गत प्राथमिक शिक्षकाच्या बदलीचा विषय मार्गी लागला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून संबंधीत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांना नव्याने बदलीच्या ठिकाणी नेमणुकीच्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे.
गुरूजींना जिल्हातंर्गत बदल्यानंतर आता आंतरजिल्हा बदलीचे वेध लागले आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाने 23 मे 2023 ला नवीन शासन निर्णय काढला असून यात या संवर्गातील शिक्षकांच्या बदल्याबाबत सुस्पष्ट धोरण ठरवून दिले आहेत.
त्यानुसार आंतरजिल्हा अधिकारी आणि संबंधीत जिल्हा परिषदेची एनओसी मिळाल्यानंतर संबंधीत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Post a Comment