पगार शासनाचा अन् जिल्हा परिषद कर्मचारी कामे करतात खाजगी... तक्रार आल्यानंतर संबंधतांना तक्रारदाराच्या नावासह अर्जाची माहितीतातडीने पोहोच केली जाते...बांधकामसह शिक्षणची आघाडी...

नगर : जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी पगार शासकीय घेऊन खाजगी कामे करत आहे. अशी खाजगी कामे करणारे कर्मचाऱ्यांची संख्या आता वाढू लागलेली आहे. या कर्मचाऱ्यांमुळे शासकीय कामकाजाची नेहमीच चव्हाट्यावर येत आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


जिल्हा परिषदेचा कारभार आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातं असाच सध्या सुरू आहे. या कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना बसू लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. एकमेकांकडे संशयाने पाहू लागलेला आहे. जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी

आर्थिक हित पाहत असून त्याचा मनस्ताप मात्र सर्वांना होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. हा प्रकार जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग या विभागांमध्ये सर्वाधिक प्रमाणात होत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. 

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह पंचायत समितीमध्ये ही सुरू असल्याची सध्या सुरू झालेली आहे.  हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. अन्यथा याचे मोठे दुष्परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली  जात आहे.  

जिल्हा परिषद कर्मचारी शासकीय पगार घेऊन खाजगी कामे करत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कामासाठी नियुक्त केली होते. तेव्हापासून आजपर्यंत ही मंडळी काम करीत आहे. आज छुप्या पध्दतीने फाईल फिरवित आहेत. अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभागआरोग्य विभागआदिती माहिती कोणी जर मागितली तर किंवा कोणी तक्रार केलेली असेल तर त्या तक्रार अर्जदाराची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी देऊन टाकतात. यामुळे तक्रारदारांना बाहेरच सेटल करून तक्रारी मागे घ्यायला लावले जात आहे. 

हा सगळा प्रकार चहाच्या ठेल्यावर होत आहे. चहाच्या ठेल्यांवरच माहितीची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे. हा प्रकार जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. सामान्य विभागाचा कारभार सध्या असामान्य पद्धतीने सुरू आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post