जिल्हा परिषदेतील सहा विभागांचा कारभार मनमानी.... विभागीय आयुक्तांकडे तक्रारी होण्याची शक्यता...

नगर : जिल्हा परिषदेतील सहा विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या झालेल्या या आहेत. या सहा विभागात सध्या प्रभारी राज सुरु आहे. या विभागांमध्ये प्रभारी अधिकार्यांसह कर्मचार्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.


जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, जल जीवन मिशन, कृषी विभाग, अर्थ विभाग महात्मा गांधी रोजगार विभाग या चार विभागातील विभाग प्रमुखांच्या बदल्या झालेल्या आहेत. सध्या या चारही विभागांचा अतिरिक्त कारभार इतर अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेला आहे. 

आपला विभाग समोर इतर विभाग सांभाळताना अधिकाऱ्यांची दमचाक होत आहे. या संधीचा फायदा कर्मचार्यांनी  उठवण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ अधिकारी जाताच कर्मचारी आपली घरगुती कामे करत फिरत बसतात. 

हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत सर्वात सुरू झालेला आहेयाकडे मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष झालेले आहे. या चारही विभागातील कामाचा वेग पाहिला तर मंदावलेला दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, जल जीवन मिशन, कृषी विभाग, अर्थ विभाग महात्मा गांधी रोजगार विभाग या चार विभागातीलकाही कर्मचारी काम कमी गप्पा मारताना जास्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे या चारही विभागातील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून माहिती देत आहेत. 

या चार विभागातील काय कर्मचारीमनमानी पद्धतीने कामकाज करीत असून सर्वसामान्यांनी विचारलेले माहितीला उत्तरे देत नसल्याच्या तक्रारीहोत आहे. तसेच सर्वसामान्यांची कामे  प्रलंबित ठेवत असल्याच्या तक्रारी होत आहे.

हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद सुरू झालेला आहे. याकडे मात्र वरिष्ठांचे दुर्लक्ष झालेले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत या चारही विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा सर्वसामान्यांमधून होत आहे.

जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभाग प्रमुखाकडे केलेली आहे. मात्र विभाग प्रमुखांकडूनसंबंधितांना योग्य सूचना गेलेले नाहीत त्यामुळेजिल्हा परिषदेत य काही कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post