नगर ः राष्ट्रवादी काॅंग्रेसची आज सव्वा अकरा वाजता मुंबई येथे पार्टी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या बाबतीत राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीची महत्वाची बैठक होती. यामध्ये काही संभाव्य उमेदवरांच्या नावाची चर्चा करण्यात आलेली आहे. .
या बैठकीला खासदार शरद पवार, आमदार जयंत पाटील, अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ व राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
निरीक्षक माजी महापौर अंकुश काकडे, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी आदी उपस्थित होते.
आ निलेश लंके यांचे घरातील पुतणीचे लग्न असल्यामुळे व आमदार रोहित पवार चौंडीच्या कार्यक्रमामुळे बैठकीला गैरहजर होते. बैठकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची चर्चा झाली लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी मागणी सर्वांनी केली.
दक्षिण लोकसभा मतदार संघातून आमदार निलेश लंके, राजेंद्र फाळके, माजी आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार आदींच्या नावाची चर्चा झाली.
यामध्ये आमदार निलेश लंके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या नावावर जोरदार चर्चा झाली. यामध्ये दोन्हीच्या नावाला समसमान शिक्कमोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी नेमकी कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दादा कळमकर यांचा दक्षिणेत चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय पक्ष बांधणीसाठी कळमकर यांनी खूप योगदान दिलेले आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्यांना आता खासदार करून त्यांनी पक्षाशी एकनिष्ठेने केलेल्या कामाचे फळ त्यांना द्यावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

Post a Comment