राहाता : तालुक्यातील प्रवरानगर येथील आहेर वस्तीवर दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही बाजूने विनयभंगाच्या फिर्यादी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. दोन्ही गटातील महिला-पुरुषांमध्ये हाणामारी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. दोन्ही बाजूने लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
एका महिलेने दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले, रात्री साडेअकराच्या सुमारास आमच्या राहत्या घरासमोर बसलेली असताना आरोपी साहील शेख लाकडी दांडके घेऊन आला व त्याने माझ्या मानेवर मारले. सागर गोरख उबाळे याने त्याच दांडक्याने
मला मारहाण केली. कमल गोरख उबाळे, हिना सागर उबाळे व संगीता जितेंद्र उबाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सागर व त्याच्या सहकाऱ्यांनी विनयभंग केला. या फिर्यादीवरून वरील आरोपींसह गोरख शंकर उबाळे यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी संकेत जया भोसले, अनिकेत जया भोसले, अभिजीत संजय ब्राह्मणे, ऋषिकेश राजू भोसले, सुनिता संजय ब्राह्मणे यांच्याविरुद्ध फिर्यादीला राहत्या घरासमोर शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करीत आहेत.

Post a Comment