कापडबाजारत आढळल्या सहा तलवारी...

नगर: कापडबाजारातील मोची गल्ली येथील महावीर स्टोअर्समध्ये छापा मारत कोतवाली पोलिसांनी सहा धारदार तलवारी जप्त केल्या. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) रात्री उशिरा केली.


शहरातील परिसरातील दुकानात तलवारी असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या पथकाने मोची गल्ली येथील दुकानात जाऊन तपासणी केली असता तिथे सहा तलवारी आढळून आल्या. 

त्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलिस नाईक पी. ए. इनामदार, पोलिस नाईक यागेश खामकर, सलीम शेख, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, कैलास शिरसाठ आदींच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post