जामखेड : जामखेड शहरातील एका शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकत सलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला आष्टी येथून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विद्यार्थिनीशी स्नॅपचॅट अॅपच्या माध्यमातून या शिक्षकाने जवळीक साधली. बालकास अर्धनग्न फोटो पाठविण्यास सांगितले. ते फोटो 'सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला आष्टी येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला.
या शिक्षकाने शिक्षकीपेशाला काळीमा फासला आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर ( वय ३० वर्षे रा. साकत) असे या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी या शिक्षकास अटक करून श्रीगोंदे सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील हर्षद लॉजवर या शिक्षकाने बलात्कार केला. कोणाला काही सांगितले, तर तिचे अर्धनग्न फोटो 'सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्याच्यावर बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमनुसार 'पोस्को'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.

Post a Comment