मुंबई : धोकादायक शस्त्रे बाळगणे हा गुन्हा असल्याने हीच हौस मुलाच्या चांगलीच अंगलट आली. हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी तातडीने मुलाचा शोध घेऊन त्याला अटक केली. प्रदीप यादव असे या मुलाचे नाव आहे.
पुण्यातील कोयता टोळीच्या दहशतीनंतर आता कोयता हे घातक शस्त्र मानले जात आहे. जिथे एकीकडे गुंडांकडून प्राणघातक शस्त्रांचा वापर केला जात आहे, तर दुसरीकडे कल्याणमधील काही मुल धारदार शस्त्रास्त्रांचा वार करून दहशत पसरवत आहेत.
त्यामुळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा धोकादायक तरूणावर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. एका मुलाने चार कोयते हातात घेतलेला व्हिडिओ स्टेटस पोस्ट केला.
काही वेळातच हातात चार कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच पोलिस या व्हिडिओतील मुलाचा शोध घेत आहेत.
हा मुलगा कल्याण पूर्वेकडील सूचक नाका परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ त्या मुलाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. प्रदीप यादव असे या मुलाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कोयते जप्त केले आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment