आरएमटी फिटनेसवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा...

केडगाव :  आंतरराष्ट्रीय योग दिन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. केडगाव येथे आर एम टी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन विविध योगा करून संपन्न झाला. 


यावेळी आर एम टी फिटनेसचे संचालक मनीष ठुबे यांनी सांगितले की आरोग्य धनसंपदा आरोग्य हीच खरी संपत्ती या संपत्ती व्यसनाच्या आहारी जाऊन संपवू नका. तरुण मुलांनी व्यायामाकडे वळणे गरजेचे आहे. 


सकाळी रोज एक तास योगा करणे म्हणजे शरीर मन आत्मा शुद्धीकरण करणे आहे. तसेच आपले शरीर निरोगी व प्रसन्न राहते. आर एम टी फिटनेस च्या वतीने आठवड्यातून दोन दिवस मोफत योगा घेण्यात येतो. तसेच विविध उपक्रम साजरे करण्यात येतात. 

जसे की मोफत वैद्यकीय तपासणी विविध व्यायाम प्रकार असे उपक्रम राबवले जातात. यावेळी परिसरातील नागरिक व आरएमटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post