घरावर गद्दार लिहूनही फाळके शांत होते.... मात्र राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चेवर फाळके म्हणाले...


नगर : जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये आलबेल होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी गद्दार लिहिलेले खडबड उडली आहे. 

आज नवीनच कहर झाला. फाळके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा जिल्हाभर झाली. ही चर्चा कोणी सुरु केली हे स्पष्ट झालेले नाही. त्यावर फाळके यांनी मी राष्ट्रवादीला कधी सोडणार नाही असे उत्तर दिले आहे.


कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडी संदर्भात राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती राम शिंदे गटाचे निवडून आले. तो राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहीत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधून होत आहे.

राजेंद्र फाळके यांच्या घरावर गद्दार लिहिल्यानंतर आज  त्यांच्या बाबत नवीनच अफवा पसरवण्यात आली. ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झालेली आहे. ते लवकरच एका पक्षात प्रवेश करणार असेमजकूर असलेले संदेश समाज माध्यमावर व्हायरल झाले.  

हे आपण नेमकी कोणी व कशासाठी पसरवली याचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रश्न आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.

राजेंद्र फाळके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचे जिल्हाभरात चर्चा झाली. अनेकांनी फाळके यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर फाळके यांनी समाज माध्यमावर संदेश टाकून आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. 

फाळके यांनी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. फाळके यांच्या बाबत ही अफवा कोणी पसरवली? कोणाच्या सांगण्यावरून पसरवली? त्यामागे कोण आहे? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. आज फाळकेंबाबत अफवा उठवली उद्या कोणाही बाबत अशीच अफवा पसरवली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. फाळके यांनी हा टाकला समाज माध्यमावर संदेश व्हायरल केला आहे.


आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि पवार साहेबांना मी कधीही सोडणार नाही. माध्यमांनी दिलेल्या बातम्या बिनबुडाच्या आहेत, त्यांना कसलाही आधार नाही. #सदैव_साहेबांसोबत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post