नगर : पोदार इंटरनॅशल स्कूल मध्ये आज योगदिन साजरा करण्यात आला. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित करण्यात आला आहे. योगाभ्यास हा भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.
याचेच महत्त्व लक्षात घेत शाळेतील विद्यार्थ्यानी शाळेतील शिक्षक गणेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, कपालभाती, वज्रासन, गोमुखासन, बद्धकोनासन, सर्वांगासन असे विविध योगासने केली.
याप्रसंगी विदयार्थ्याना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले तसेच आपल्याला सुदृढ शरीर जसे आवश्यक तसे मन सुद्धा सुदृढ आसायला हवे. त्यासाठी योगासने प्राणायाम आवश्यकता आहे.
योगाने मन शांत राहते. मन स्थिर राहते, ज्यामुळे सकारात्मक विचारांचा प्रवाह निर्माण होतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. तसेच अभ्यासात चित्त एकाग्र होते. त्यासाठी फक्त एक दिवस योगासने न करता रोजच योगासने करायला हवी, असे आवाहन या वेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्याना केले.
अगदी पहिली , दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा योगासने केल्याबद्दल याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली, कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक चंद्रकांत वंजारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूर्यकांत बंगारी यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment