चांदा : येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 21 जून 2023 हा दिवस जगतिक योग दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगशिक्षक बाळासाहेब भोसले यांनी योग वर्गाचे उत्तम धडे दिले.
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ जावळे यांनी जीवनातील योग ,व्यायाम, यांचे महत्त्व सांगितले. 'चांगले आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे'.
आपले आरोग्य आबादीत राखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रोज योगासने करून जपावे. असा संदेश प्राचार्यांनी दिला. नंतर योगा शिक्षक श्री भोसले यांनी योग वर्गाला सुरुवात केली. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी या कर्यक्रमात् उस्फूर्तपणे सहभाग घेतला.


Post a Comment