चार वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण

चांदा : नेवासा तालुक्यातील वडाळा ते कारेगाव या तीन किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण रस्त्याचे काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलेले होते.


तब्बल १ कोटी ५० लक्ष वडाळा ते कारेगाव या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर सप्टेंबर 2019 रोजी निघाली होती. मात्र शासकीय दिरंगाई मुळे हे काम तब्बल 4-वर्षे रखडले. त्यानंतर नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी शासन दरबारी सातत्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला. 


त्यानंतरच हे काम पूर्ण झाले. वडाळा ते कारेगाव रस्त्यावर सातत्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या वडाळा ते कारेगाव मार्गावर रांजणगाव, माळीचिंचोरे, म्हाळस पिंपळगाव ही मोठाली गावे येत असल्याने येथील नागरिकांची हा रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी होत होती. 

रस्त्यावरून वाहतूक करताना खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होऊन शाळकरी विद्यार्थी किंवा इतर प्रवासी जखमी झाले आहेत. लोकांची अडचण लक्षात येतात आमदार शंकरराव गडाखांनी हा रस्ता तातडीने पूर्ण करावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले .

आज हा रस्ता आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे पूर्णही झाला आहे .त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले.

या चकचकीत व गुळगुळीत डांबरी रस्त्यामुळे नक्कीच नेवासा तालुक्याच्या विकासात भर पडेल व या रस्त्यावर दळणवळण वाढून प्रवासादरम्यान वेळेची बचत होऊन नागरिकांची वेळेत महत्त्वाचे कामे होऊन नक्कीच आर्थिक बाजू भक्कम होईल. असेही यावेळी परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवले.

आ गडाख यांनी पाठपुरावा करत  कामे प्रत्यक्षात  पूर्ण करण्याचा सपाटातच लावला आहे. हे या कामावरून सिद्ध होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post