बापूसाहेब तांबे यांनी शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवावी...

नगर : जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांशी चांगला संपर्क आहे. जिल्ह्यात संघटनही मजबूत केलेले आहे. त्यामुळे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 


जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत बापूसाहेब तांबे यांनी सत्ता आणली आहे. सत्ता आल्यानंतर तांबे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभारपुढे नेण्यास सुरुवात केली आहे. 

शिक्षकांमधील एक आदर्श नेतृत्व म्हणून तांबे यांच्याकडे पाहिले जात आहे. जिल्ह्याबरोबरच राज्यभरातील शिक्षकांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. 

त्यामुळे शिक्षकातील नेते बनलेले आहेत.  त्यांनी शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवली अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत तांबे यांनी एक हाती सत्ता आणली आहे. त्यांच्या नेतृत्वावर सभासद शिक्षकांनी पुन्हा विश्वास ठेऊन बँकेत सत्ता दिलेली आहे. तांबे यांनी बँकेत शिक्षकांच्या हिताचे कार्य केले आहे.  


सभासदांनी पुन्हा तांबे यांना बँकेत सत्ता दिली आहे. शिक्षक संघटनांसह इतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांना कर्मचार्यांच्या अडचणी चांगल्या माहिती आहेत.

बँकेत जसे शिक्षक सभासदांसाठी तांबे यांनी निर्णय घेतले आहे. तसेच ते शिक्षक आमदार झाल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांना आहे. अनेक प्रश्न आहेत. 

ते सोडवणुकीसाठी आता हक्काचा माणूस पाहिजे अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे तांबे यांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उभे राहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांमधून केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post