अमर छत्तीसे
श्रीगोंदे : नगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज श्रीगोंद्याच्या दौर्यावर असताना लोणी व्यंकनाथ येथे राष्ट्रवादीचे राज्याचे नेते बाळासाहेब नाहाटा यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे आज श्रीगोंद्याच्या खाजगी दौर्यावर होते. त्यांनी लोणी व्यंकनाथ येथे सांत्वन भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे भाजपचे विशेषतः आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांच्यात नाराजी पसरली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी लोणी येथे जाहीर कार्यक्रमात खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या समोर लोणी व्यंकनाथ मध्येच वाद झाला होता. पण त्यावर खासदारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
पण कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना घडली होती. पण पुन्हा आज खासदार नाहाटांच्या दारी गेल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांची ही नाराजी आगामी काळात डोकेदुखीची ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. याचा मात्र पक्षाला आगामी काळात फटका बसणार आहे. त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घालू योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच कार्यकर्त्यामध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दक्षिण लोकसभा मतदार संघात बैठका घ्याव्यात अशी मागणी होत आहे.
Post a Comment