आढळगाव ते गिरमकर वस्ती रस्त्याची दयनीय अवस्था...दोन वर्षांपासून काम रखडले... संतोष सोनवणे यांचा उपोषणाचा इशारा....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव जिल्हा परिषद गटाचे तत्कालीन सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांच्या माध्यमातून आढळगाव ते गिरमकर वस्ती या रस्त्यासाठी सुमारे १५ लाखाचा निधी मिळाला पण २०२१/२२या वर्षातील काम रखडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  अंतर्गत मजबुतीकरण व डांबरीकरण करणे यासाठी सुमारे १५ लाखाचा निधी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांच्या माध्यमातून मिळाला होता 

या कामाचे भूमिपूजन खा. डॉ सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते ऑगस्ट २०२१ मध्ये झाले सुरुवातीला मजबुतीकरण काम केले. गेल्या दोन वर्षांपासून हे कामच रखडले आहे. 


सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचे अर्धवट काम नेमके कशामुळे रखडले आहे. याचे कारण काही समजले नाही. 

या कामाबाबत अनेकदा तक्रारी आल्या आहेत त्यामुळे  काम का रखडले याचा खुलासा संबंधित ठेकेदार एजन्सी ला नोटीस बजावण्यात येणार आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण काम केले असल्याने त्याचे यापूर्वी च बिल अदा केले आहे. आता फक्त डांबरीकरण कामाचे बील राहिले आहे. हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी संबंधित एजन्सी ला नोटीस देऊ अशी प्रतिक्रिया बांधकाम विभागाचे अभियंता डी. डी. कांगुणे यांनी तेजवार्ताला सांगितले.

 

आढळगाव मध्ये  अनेक विकास कामासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व आमदार बबनराव पाचपुते यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला पण ठेकेदार चुकीचे कामे करताना आढळगाव ते गिरमकर वस्ती रस्त्याचे काम दोन वर्षापासून रखडले असताना एजन्सी ला ७५टक्के बील अदा करणार्या अधिकार्यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा संतोष सोनवणे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post