बीड : परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक बिनविरोध केली.
कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाच्या चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे पुन्हा एकदा या पदावर विराजमान झाल्या आहेत तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे.
या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे १० उमेदवार, तर पंकजा मुंडे यांचे ११ उमेदवार अशी बांधणी करण्यात आली.

Post a Comment