पारनेर : वडनेर हवेली येथे जलजीवनच्या माध्यमातून १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम सुरू होण्या अगोदरच एका नेत्याच्या सांगण्यावरून सरपंचासह स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत समोर उपोषण केले. पाणी योजनेच्या उपोषणाला टक्केवारीचा वास असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेकर यांनी केली आहे.
या पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठेकेदार नियुक्त केलेला आहे. ठेकेदाराकडून आराखडा तयार असून सरपंचांनी उगम स्थानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास दिला असताना आणि तो अजून मंजूर नसताना ठेकेदाराकडून काम चालू करण्याची सरपंचाची अपेक्षा व त्या कारणाने ठेकेदार बदलायचा अट्टाहास का? यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणे म्हणजे जल जीवनचे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप इंजिनिअर सतीश भालेकर यांनी केला आहे.
वडनेर हवेलीतील जलजीवन चे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले होतेफ काम चालू केल्यावर उगम स्थानावरील स्थानिक शेतकर्यांनी ते काम थांबवले. काम सुरू करण्यापूर्वीच काम थांबले.
लोक नियुक्त सरपंच असताना ठराविक चार ते पाच ग्रामस्थांना घेऊनच उपोषण करण्याची वेळ सरपंच लहू भालेकर यांच्यावर का आली व गावातील विषय असल्याने गावात याबाबत गुप्तता पाळण्यात आली. ठेकेदार बदलणे हा पर्याय नाही अशी ग्रामस्थांची मागणी चे पत्र कार्यकारी अभियंत्यास दिले असल्याचे सतीश भालेकर यांनी सांगितले आहे.
या उपोषणाच्या नौटंकीमुळे गावचे नुकसान होणार असून ठेकेदारापेक्षा पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षा भालेकर यांनी व्यक्त केली आहे. ठेकेदार बदलण्याचा अट्टाहास का? असाही सवाल भालेकर यांनी केला आहे.

Post a Comment