मान्सून या तारखेला येणार...

मुंबई : गेल्या १०-११ दिवसांत मान्सूनने केलेली वाटचाल आता एकाच दिवसात पूर्ण केल्याने मान्सून केरळच्या किनार्‍यापासून ४०० किमीवर आहे. सध्या मान्सूनचा दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात आहे. 


दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीतही मान्सूनची आगेकूच सुरू आहे. त्याआधारे मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकेल.

महाराष्ट्रात यंदा मान्सून सुमारे ८ दिवस उशिराने येण्याची शयता आहे. त्यामुळे १४-१५ जूनला राज्यात मान्सून दस्तक देऊ शकतो. मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात २५ टक्के कमी पाऊस पडण्याचा हवामान अंदाज आहे. 

दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शयता आहे. पुढचा एक आठवडा मान्सूनची गती कमी असेल. 

जूनच्या दुसर्‍या आठवड्यात त्याचा वेग वाढून तो कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसेल. हवामानतज्ज्ञ म्हणाले, मान्सूनवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो.

मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक असते. या वेळी असे झाले नाही. मार्च ते मे दरम्यान १२ टक्के पाऊस झाला. राज्यवार पाहिल्यास सर्वाधिक १३६ टक्क्यांहून जास्त पाऊस मध्य भारतात (मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र) झाला. पश्चिम बंगाल, बिहार व झारखंड वगळता देशातील उर्वरित भागात एप्रिल-मे दरम्यान उष्णतेची लाट नव्हती.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post