नगर : तालुक्यातील गुंडेगावच्या आसपासच्या परिसरात रविवारी (ता.४) दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास पावसाने विजेच्या कडकडाटासह वादळीवाऱ्या बरोबर हजेरी लावली.वारा इतका सोसाट्याच्या होता की नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली होती.
अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी वेग येणार आहे.तसेच बी बियाणे खरेदीला ही मागणी वाढणार आहे.कारण हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण जादा होईल असे वर्तवण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील काही भागात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली गुंडेगाव येथे अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ होऊन बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे ही नुकसान झाले आहे.
पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या पावसामुळे शेती मशागतीला व खरीप पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याचे नागरिकांतून भावना व्यक्त होत आहेत. गुंडेगाव मध्ये उन्हाचे तापमान देखील ३८ ते ४० अंश होते.त्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त झाले होते.
दरम्यान गुंडेगाव परीसरात साधारण दिड तासाच्या वर जोरदार पाऊस झाल्यानंतर हवेत गारवा व स्वच्छ आकाश मनाला समाधान देणारे होते.पहिल्या पावसा अभावी गुंडेगाव भागातील शेत जमीन मशागतीसाठी खोळंबल्या होत्या.
आता ३ ते ४ तासांचा दमदार पाऊस पडल्याने मशागतीला वेग येणार आहे.यंदा गुंडेगाव परीसरात वरुणराजाची कृपा दिसून येत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांना पीक पेरणी समाधान कारक होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.

Post a Comment