नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात जलजीवनची अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या निकृष्ट कामांच्या छायाचित्रांसह कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत. ही कामे पुन्हा दर्जेदार पद्धतीने करावीत. अन्यथा आपण या विरोधात ठोस भूमिका घेणार आहे, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
आमदार पवार यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासोबत जलजीवनच्या कामांसंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी
सिद्धाराम सालीमठ यांच्याशी कुकडीच्या आवर्तनाबाबत बैठक घेऊन आवर्तनाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या व इतर बांधकामांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पवार पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
पवार महणाल की, जिल्ह्यात विकासकामांबाबत असमतोल असून, कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण अनेक कामे मंजूर करून आणली आहे. एमआयडीसीही मंजूर झाली आहे. गावनिहाय कामांचे नियोजन केलेले आहे असे ते म्हणाले.

Post a Comment