अमर छत्तीसे
श्रीगोंदा : अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी घनश्याम शेलार यांनी बीआरएस'चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे पक्ष प्रवेशासंबधी भेट घेतली होती. त्या अनुशंगाने शेलार यांची बीआरएस पक्षात प्रवेश करूण घेण्याकरीता १४ जुन तारिख निश्चित करण्यात आल्याचे निमंत्रण आले.
शेलार व त्यांचे समर्थक १३ रोजी १२ च्या सुमारास हैद्राबादकडे रवाना होवून तेथील हॉटेल द पॅलेस येथे पाहुणचार घेतला. त्यानंतर आज शेलार यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएसशेलार यांनी) या पक्षात जाहिर प्रवेश केला.
या वेळी बीआरएस पक्षाचे पदाधिकारी यांच्या सह श्रीगोंद्यातील प्रशांत शेलार, शामभाऊ जरे, शरद पवार, अजिम जकाते प्रविण शेलार, प्रकाश निंभोरे, संजय आनंदकर, केशव झेंडे, विलास भैलुमे, आबासाहेब शिंदे, संदीप दहातोंडे, रिंकु इथापे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शेलार यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याने श्रीगोंद्यात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करत आनंदउत्सव साजरा केला.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून शेलार यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला शेलार यांचा सामना करावा लागणार आहे.
Post a Comment