श्रीगोंद्यातील संधीसाधू नेत्यांना आताच आमदार झाल्यासारखे वाटू लागले....

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : तालुक्यात प्रत्येकाला आमदारकीचे वेध लागले आहेत. आतापासूनच काहींनी तालुक्यात मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी सुरू करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे काहींचेप्रयत्न सुरू असताना पॅकेज वाढून कसे मिळेल यासाठी आता घोषणाबाजी करू लागले आहेत. पॅकेज वाढून घेणाऱ्यांना आत्ताच आमदार झाल्यासारखे वाटू लागले आहेत.


आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा नगर मतदारसंघात चुरशीची होणार आहे. या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. निवडणूक अजून लांब असली तरी काही मतदारसंघात आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. आगामी निवडणुकीत धावपळ नको म्हणून मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घेत आहेत.

तालुक्यातून भाजप व राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार उभा राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु भाजप गटात अनेकांना आपल्याला संधी मिळेल अशी आशा लागली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातही आपल्याला संधी मिळेल अशा अनेकांना लागली आहे. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनाही आपल्याला इतर पक्षातून उमेदवारी मिळेल अशी आशा लागली आहे. 

भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी नेते आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून तालुक्यात मोर्चे बांधणी करीत आहेत. त्यासाठी दिवसरात्र कार्यकर्ते व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संघटन उभे करीत आहे. आशा नेते मंडळींना याबाबत कार्यकर्त्यांचेही एकमत होत आहे. परंतु तालुक्यात काही संधी साधू नेते आहेत. 

ही संधी साधून नेतेमंडळी निवडणूक निवडणुकांच्या अगोदर मोठ-मोठ्या घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात ते काहीच करत नाही. गाडीला डिझेल एकाचे घेऊन दुसऱ्यावर टीका करणारे नेतेमंडळी तालुक्यात आहे. गाव पातळीवरएका पक्षाबरोबर जिल्हा पातळीवरील निवडणुकीत दुसऱ्या पक्षाबरोबर राज्य पातळी निवडणुकीत तिसऱ्या पक्षाबरोबर व लोकसभा निवडणुकीत चौथ्या पक्षा बरोबर काहीजण रहात आहेत. 

असे करून प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. काहीजण आपला स्वार्थ साधून घेत आहे. निवडणुकीच्या अगोदरआपणअशी घोषणा करून चर्चेत येतात. आणि आपले पॅकेज वाढून घेतात. ऐनवेळी निवडणुकीतून मात्र घोषणाबाजी करणारी नेते मंडळी बाजूला गेलेली दिसून येतात. श्रेष्ठींनी सांगितलं म्हणून आपण उमेदवारी मागे घेतली अशी बतावनी ते ऐनवेळी करतात. असे प्रकारमागील काही निवडणुकीत झालेले आहेत.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post