श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या तक्रारींना कंटाळून जिल्हा परिषद समोर उपोषण केले.
जिल्हा परिषदचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात तसेच विकास कामात ही अनेक खोट्या तक्रारी केल्यामुळे विकास कामांवर परिणाम होत आहे.
या तक्रारींची पुराव्याशिवाय दखल घेतली जाऊ नये म्हणून सरपंच शिवप्रसाद उबाळे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, जिजाराम डोके, सत्यवान शिंदे, मनोज ठवाळ, नितीन गव्हाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment