वर्धापन दिनाची तारीख हुकली.. एकऐवजी तीन जूनला होणार विविध कार्यक्रम...

नगर : गेल्या 74 वर्षापासून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन एक जूनला साजरा होत असतो. मात्र ७५ वा वर्धापन दिनाची तारीख बदलण्यात आली आहे. एक जून ऐवजीतीन जूनला वर्धापन दिन सोहळा होत आहे. तारीख बदलण्याच्या प्रकारामुळे एसटी कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षीच एक जूनला साजरा केला जातो. मात्र यंदा तारखेत बदल करण्यात आलेला आहे. तीन जूनला वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात यावा अध्यादेश एसटी प्रशासनाने दिलेला आहे. या अध्यदेशावर एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. 

प्रशासनाने तारीख बदलली असली तरीकाही ठिकाणी केककापून कालच वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे.  तीन जून रोजी होणारा कार्यक्रम हा आता फक्त कागद रंगवण्यापुरता होणार आहे. 

दरम्यान एसटीच्या जनसंपर्क विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात वर्धापन दिन तीन जूनला साजरा होत असल्याचे म्हटले आहे. 

सदर सोहळ्यानिमित्त ६ याय ३ फुट आकाराचे कापडी फलक तयार करून राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावे. 

सदर फलक लाकडी अथवा लोखंडी पट्टीने आरेखित करून दिर्घकाळ टिकेल अशा पध्दतीने लावावा तसेच या कापडी फलकाच्या जाहिरातीचे आर्टवर्क (आरेखन) जनसंपर्क शाखेकडून ईमेलव्दारे पाठविण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने सदर ६ बाय ३ फुट आकाराच्या जाहिरातीचे आटवर्कची लिंक (https://we.tl/t-o९No ShareQ) व आर्टवर्कची पीडीएफ फाईल या परिपत्रकासोबत पाठविण्यात येत आहे. त्यानुसार सदरची जाहिरातीचे फलक रा.प. बसस्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावे. त्याचा कार्यपूर्ती अहवाल या शाखेस पाठविण्यात यावा. असे निर्देश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आलेले आहेत. 

हा अध्यादेश आज एक जूनला देण्यात आलेला आहे. त्यावर आता तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे.  

एक जूनला साजरा होणारा एसटीचा वर्धापन दिन 3 जूनला साजरा होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  

एसटीच्या वर्धापन दिनाच्या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करावे असा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आलेला आहे. परंतुहा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यास कर्मचारी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्याला वरिष्ठ ही तसेच जबाबदार आहेत. त्यांच्या वारंवार बोलल्यामुळे कर्मचारीनाराज झालेले आहे. काम करूनही बोलणे खायचे न करता ही बोलणे खायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही. औपचारिकता म्हणून या कार्यक्रमाच्या प्रक्रियेत सहभागी होत असून निमंत्रणही शासकीय पद्धतीने लोकांना देत आहेत. फोन द्वारेअनेकांना निमंत्रित करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post