नगर : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्याचा आदेश एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले असून बसस्थानकांना भेटी देऊ लागले आहे.
अहमदनगर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने नेहमीच्या स्टाईलने कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन एक जून ऐवजी आता तीन जून रोजी साजरा होणार आहे. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचनाही एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने सर्व विभाग नियंत्रण कार्यालयांना दिलेल्या आहेत.
विभाग नियंत्रक कार्यालयाने वरिष्ठ कार्यातून आलेला आदेशच आगार प्रमुखांना पाठवून दिला आहे. आज वरिष्ठ कार्याकडून आदेश येतात अधिकाऱ्यांना जाग आली आहे. तातडीने आगाराला त्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
कामाचा ताण पडल्यानंतर नेहमी त्या वरिष्ठ अधिकार्याकडून इतर कर्मचाऱ्यांवर तोंड सुख घेतले जाते. आता हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम कसा आयोजित करायचा असा प्रश्न त्या अधिकाऱ्यांसमोर उभा टाकला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या अधिकाऱ्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतले. यामुळे त्यांचे चेहरे रडवलेले झाले होते.
खूप सहन केले आता बस झाले यापुढे जर बोलणे झाले तर वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यात येईल असा इशाराच कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी बोलताना दिला आहे. चुकलं तर वरिष्ठांना बोलण्याचा अधिकार आहे.
मूर्ख, बावळट असे बोलण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्याला कोणी दिला असा सवाल कर्मचारी एकमेकांना विचारत आहे. अधिकाऱ्यांनी पायरीने राहावे. पातळी सोडून बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी जुन्या ठिकाणी केलेल्या कामकाजचा हिशोब काढला जाईल असा इशारा जाता कर्मचारी देऊ लागले आहे.

Post a Comment