नगर : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना जर लोकसभेसाठी नगरमधून उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक सुद्धा चांगली स्पर्धात्मक होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकालाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.
नगर दक्षिण मतदार संघामध्ये काँग्रेसने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी केली. यावर खासदार सुजय विखे यांनी थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यांना जर संधी दिली तर या ठिकाणी स्पर्धात्मक अशी निवडणूक होईल असंही त्यांनी सांगितले.
खासदार विखे म्हणाले की, मी उमेदवार असेल-नसेल हे काही मला माहीत नाही. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल व देवेंद्र फडणवीस ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्यासाठी सर्वजण प्रचार करतील, असं उत्तर दिलं.
लोकसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार आहे की नाही, यापेक्षा पक्ष ज्याला उमेदवारी देईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यांना उमेदवारी फायनल करतील. त्याचा भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रचार करतील, असे ते म्हणाले.

Post a Comment