नगर : गेल्या काही दिवसांपासून आवरमध्ये दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणे सापडत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पाठीमागील पार्किंगच्या ठिकाणीच या दारुच्या बाटल्यांचा खत पडल्याचे दिसून येत आहे. याबाबतकिती प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. अनेक जणदारू पिऊन कार्यालयात कामकाज करीत असल्याची चर्चा सुुुरु आहे.
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या मनमानी पद्धतीने सुरू आहे. कोणाचीच कोणाला माहिती नसते. अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद नसल्याचे दिसून येत आहे. काही अधिकारी मनमानी पद्धतीने आपला कारभार करत आहे. जशी अधिकारी वागत आहे तसेच कर्मचारी वागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे या सर्व बाटल्या जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस चारचाकी वाहनांच्या पार्किंगमध्येच आढळून येत आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू आहे. याकडे सामान्य प्रशासनसह दुर्लक्ष झाले आहे.
जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी दारू पिऊन कामकाज करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषद सुरू आहे. यामुळे वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
.

Post a Comment