नगर : मला आमदार करायचे की नाही हे पारनेरची जनता ठरवेल परंतु तुमच्या लाडक्या लेकाला खासदार करायचं की नाही हे आता आम्ही ठरवू, असं म्हणत लंके यांनी विखे पाटलांवर पलटवार केला आहे.
काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेरच्या आमदारांना अजून बरंच काही शिकायचंय आहे. ते अनेकदा बालिश हरकती करत राहतात. मला वाटतं ते पहिल्यांदाच निवडून आलेत त्यांना पुन्हा निवडून यायचे दिसत नाही, अशी खोचक टिप्पणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला नीलेश लंके यांनी उत्तर दिले आहे.
मला आमदार करायचे की नाही हे पारनेरची जनता ठरवेल परंतु तुमच्या लाडक्या लेकाला खासदार करायचं की नाही हे आता आम्ही ठरवू, असं म्हणत लंके यांनी विखे पाटलांवर पलटवार केला आहे.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही आ. लंके यांनी विखेंना दिला आहे.

Post a Comment