माजी सभापती सुनिल गडाख यांच्याकडून छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा सुशोभीकरण कामाची पाहणी... निधीची कमतरता भासू देणार नाही...


चांदा :  येथील बाजार तळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या कामाची जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम खात्याचे माजी सभापती सुनील गडाख यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली.


माजी सभापती सुनील गडाख यांच्या विशेष निधीतून चांदा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी तब्बल साडेअकरा लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाची पाहणी आज श्री गडाख यांनी केली .लवकरच या कामाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 


यावेळी  गडाख यांनी सांगितले की माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात विकासाचे काम जोरात सुरू असून प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून चांदा येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवराय पुतळा सुशोभीकरणासाठी आणखी कितीही निधी लागला तरी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. 

सुशोभीकरण  कामाची पाहणी केल्यानंतर सोमेश्वर पतसंस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी श्री गडाख बोलत होते. यावेळी श्री सोमेश्वर पतसंस्था ,चांदा ग्रामपंचायत, श्री गणेश सोसायटी, तसेच विविध संघटना व मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणासाठी  दिलेल्या भरघोस निधीबद्दल श्री गडाख यांचा सन्मान करण्यात आला. 


यावेळी नेवासा प सचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी  सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली .तसेच गडाख परिवाराने चांदा आणि परिसरातील विकास कामासाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल चांदा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

या प्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे ,माजी जि प सदस्य अनिलराव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी ,तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहनराव भगत, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब दहातोंडे ,माजी सरपंच संजय भगत, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, शिवाजी दहातोंडे ,रवींद्र जावळे, दिपक जावळे  विजय रक्ताटे, दिलीप बोरुडे, दीपक जावळे, ,सोमनाथ दहातोंडे, रावसाहेब दहातोंडे,संतोष गाढवे ,चांगदेव पुंड ,अशोक जावळे ,नाथा जावळे, इंद्रजीत कांबळे, गोरख दिवटे, सादिक शेख, ठेकेदार वैभव दहातोंडे, अरुण दहातोंडे, चंदू जावळे ,जीवन आढाव, आदिसह चांदा परिसरातील ग्रामस्थ व शिवप्रेमी युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सोमेश्वर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कारभारी जावळे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post