श्रीकृष्ण हंगा मुंगशी विविध कार्यकारी सेवा सोसा.सभासदांसाठी १२ टक्के लाभांश वाटप !...

पारनेर : ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी बांधवांची जीवनदायी समजली जाणारी व शेतकरी बांधवांच्या मूलभूत गरजांची सोडवणूक करणारी वित्तीय संस्था म्हणजे सेवा सोसायटी शेतकरी बांधवांना अल्प दरात वित्तीय पुरवठा कसा देता येईल या उद्देशाने राज्यातील सेवा सोसायट्या काम करत आहेत. 


हंगा गावात आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालू असून त्या संस्थेच्या माध्यमातून हंगा गाव व मुंगशी गावातील शेतकऱ्यांना विशेष लाभ सभासदांना मिळाला पाहिजे या उद्देशाने आ. लंके यांच्या मार्गदर्शना खाली सर्व संचालक मंडळाने निर्णय घेउन सेवा सोसायटी सदस्यांना १२ % लाभांश देण्याचे सर्वांमते ठरले गेले.

तसेच सदर संस्थेचे या वर्षीचे एकूण कर्ज वाटप ७ कोटी १५ लाख इतके आसुन  वसुली ६ कोटी ५० लक्ष ईतकी आहे. संस्था बँक पातळीवर ९३.५ % वसूली असुन संस्थेचे भागभांडवल ५५ लाख इतका आहे  २५ लाख रु एवढा निव्वळ नफा या वर्षी झाला आहे .

संस्थेचे लाभांश वाटप करताना आमदार निलेश लंके यांचे बंधू दिपक आण्णा लंके चेअरमन बापू महाराज दळवी,संस्थेचे व्हा . चेअरमन श्रीमती शोभा भास्कर थोरात, सरपंच राजेंद्र शिंदे,जेष्ठ संचालक भाऊ साठे, आबासाहेब दळवी, मोकाते. सुदाम थोरात, कारभारी नगरे , संदीप शिंदे , मुंगशी गावचे सरपंच आनिल कर्पे सतिष थोरात, सचिन थोरात सचिव चंदन भाऊसाहेब ,गोरक्ष मोकाते,भाऊ रासकर यांच्या सह सेवा सोसायटी सदस्य संचालक व मान्यवर ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते .

या वर्षी खरीप पीक वाया गेल्यामुळे आमदार लंके यांच्या संकप्लनेतून सभासदांसाठी काही हिताचे निर्णय घेता येतील का ? असे संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मांडले व सर्व संचालक मंडळानी १२ % लाभांश वाटपास मान्यता दिली. संस्थेने सभासदांच्या हितासाठी मागील वर्षी १० % लाभांश वाटप केला आहे. 

सेवा सोसायटीच्या माध्यमातून स्वस्त दरात. खते, बि -बियाने व ओषधे मिळावीत म्हणून एक कृषी सेवा केंद्र सुरु केले आहे. या पूर्वी संस्थेने विध्यार्थी, अपंग, विधवा, कष्टकरी, ग्रामस्थ यांच्या पर्यंत शासनाच्या विविध उपक्रम व सेवा उपलब्ध व्हावीत म्हणून एक नवीन सेतु केंद्र सुरू करण्याचा मानस असुन सदर शेतु केंद्र लवकरच सुरू होईल, असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्वांमते ठरले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post