अल्पवयीन मुलीला त्रास देणारा जेरबंद

नगर : अल्पवयीन मुलीला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले.


सर्फराज बाबा शेख (वय २३ वर्षे, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी मूळ राहणार बुलढाणा हीचे आईने ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी फिर्याद दिली होती. आरोपीने अल्पवयीन  मुलीच्या मोबाईलवर मेसेज करून त्रास दिला होता. तसेच जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली होती. 

कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ ड ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी हा भिंगार येथे वेशीमध्ये बसलेला असल्याची माहिती कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळाली. 

या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वास भान्सी करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post