जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील कर्मचार्यांची कर्यालयीन वेळेत दिवाळी खरेदी जोमात... प्रशासन कोमात...

नगर : दिवाळीची धामधूम सुरू झालेली आहे. या धामधुमीत जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत खरेदीसाठी तास न तास करून मग कामावर येत आहे. यामुळे जिल्हाभरातून येणार्या नागरिकांना तास न् तास कर्मचार्यांची वाट पहावी लागत आहे.


जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज सुरू आहे. या प्रशासन काळात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनेकदा काही अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडत नाही. कार्यालयात कमी चहाच्या ठेल्यावरच कर्मचारी आढळून येत आहेत.

विशेष म्हनजे दिवाळीसणामुळे सर्वजण खरेदीत व्यस्त आहेत. रजा न टाकताच काही कर्मचारी दिवाळी साहित्य खरेदीकरून आणत आहेत. यामध्ये महिला वर्गाची संख्या अधिक दिसून येत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. अशा कर्मचार्यांवर सामान्य प्रशासन विभाग कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. 

हा सर्व प्रकार उघड करण्यासाठी काहीजण माहिती अधिकारात आता कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेजची मागणी करून संबंधित कर्मचार्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत. काही जणांनी तर विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

गेल्या पावनेदोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज आहे. या प्रशासक राज काळात कामे गतीमान होण्याऐवजी अनेकांची कामे खोळंबली आहेत. पदाधिकारी असताना कामात अडथळे येतात अशी ओरड अधिकारी व कर्मचारी करीत होते. 

परंतु गेल्या पावनेदोन वर्षात पदाधिकारी नसताना विकास कामे वेगाने होण्याऐवजी खोळंबली आहेत. विशेष म्हनजे कार्यालयीन वेळेत कर्मचारी जागेवर रहात नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post