कोषाची दारे उघडली तर असंख्य संधी समोर उभ्या दिसतील....

नगर  ः उद्योगजगतात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून, प्रत्येकाने ते आत्मसात करायला हवे. देशांतर्गत व जगाच्या पातळीवरील नवनवीन संकल्पना व घडामोडींचा आजच्या पिढीने शोध घेऊन त्यापेक्षा काहीतरी नवीन शोधता येईल का, यासाठी नेहमी अद्ययावत असायला हवे. नगरच्या उद्योजकांना पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे अनेक बाबींसाठी जावे लागते. परंतु या पदग्रहण सोहळ्यात आनंदाने सांगावेसे वाटते की, ही उणीव आमीच्या ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर संस्थेच्या माध्यमातून दूर झाली आहे. सीजी पॉवर यासाठी 1 कोटी रुपये भरून निधी देऊन आमीला पाठबळ देऊ  कोषाची दारे उघडली की असंख्य संधी समोर उभ्या असतात, हे यातून आमीचे पदाधिकारी व सदस्यांनी दाखवून दिले, असे प्रतिपादन सीजी पॉवर चे व्हाईस प्रेसिन्डेट इंद्रनील धनेश्वर यांनी केले.


आमीचा पदग्रहण समारंभ एमआयडीसी जिमखाना येथे पार पडला  याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची श्री. धनेश्वर व सचिन कोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने प्रारंभ झाला. प्रास्ताविकात मिलिंद कुलकर्णी यांनी नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर केली. 

अध्यक्ष- जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष- महेश इंदाणी, जनरल सचिव- सागर निंबाळकर, सचिव- प्रफुल्ल पारख व चिन्मय सुखटणकर, सहसचिव- सतीश गवळी, खजिनदार- सुमित लोढा यांची एकमताने निवड करून प्रमुख पाहुणे श्री. धनेश्वर व श्री. कोतकर, तसेच मावळते अध्यक्ष राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, दिलीप अकोलकर, दौलत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मावळते अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, आमी संघटनेने सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ऑक्सिजन प्लांट व दुसरा ॲटो इंजिनिअरिंग कलस्टर हे दोन प्रकल्प प्रगतिपथावर आणण्याचा आनंद आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांमुळेच आमी यशस्वीतिकडे जात असून, माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आमीचे पदाधिकारी व सदस्य खंबीरपणे पाठीशी राहिले. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यापुढील काळात आम्ही सर्वजण नूतन कार्यकारिणीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असू, असे ते म्हणाले.

नूतन अध्यक्ष जयद्रथ खाकाळ म्हणाले की, आमीच्या माझ्या उद्योजक सोबतींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा देत जी नवीन कार्यकारणी जोडून दिली, त्यांना बरोबर घेऊन जबाबदारी सार्थ ठरवू. नेहमी आमीच्या सदस्यांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यास मी बांधील राहील. यासाठी जुन्या कार्यकारिणी व माझ्याबरोबर आमीची नवीन पिढी जोडली आहे, त्यांना बरोबर घेऊन काम करू. अनुभवाची शिदोरी कायम माझ्याबरोबर ठेवीन व माझ्या कार्यकाळात आम्ही संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करील, असे सांगितले.

यावेळी संंजय बंदिष्टी, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, महेश इंदानी सागर निंबाळकर, मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दिलीप अकोलकर, महेश इंदाणी, चिन्मय सुखटणकर, प्रवीण जुंदरे, सचिन काकड, पुरुषोत्तम नावंदर, अमोल घोलप, सचिन पाठक, दीपक नागरगोजे, गणेश कोलार सुनील मुनोत, प्रीतम शिंदे, रोहन गांधी, निनाद टिपूगडे, राजेंद्र शुक्रे, सुमित सोनवणे, ईशान कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, किशोर वाकळे, प्रफुल्ल पारख , अपूर्व गुजराथी , आमीचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post