शरद पवार यांचा फोटो कशाला वापरता...

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली. 


तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. मग शरद पवारांचा फोटो का वापरता?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला. निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता, असा प्रश्न न्यायालयाकडून अजित पवार गटाला विचारण्यात आला. 

तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवारांसोबत राहायचे नाही, असा निर्णय तुम्ही घेतला. मग आता त्यांचा फोटो का वापरता? आता स्वत:ची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा, अशा सूचना न्यायालयानं अजित पवार गटाला केल्या आहेत.

या न्यायालयाच्या सूचनांमुळे अजित पवार गटाला आता शरद पवार यांचा फोटो वापरता येणार नाही. त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यातून  आता  अजित पवार गट कसा मार्ग काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post