नगर : केडगाव परिसरात असलेल्या लिंक रोडवर गायके मळ्याजवळ मंगळवारी - (ता.१२) रात्री सव्वा आठच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला पुन्हा एक बिबट्या दिसला आहे. तो दुचाकी स्वारासमोर रस्ता ओलांडून गेला आहे.
रस्त्याच्या खाली असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे केडगाव परिसरातील भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे.
केडगाव परिसर व केडगाव-निंबळक बायपास रोडवर तसेच लिंक रोडवर बिबट्याची दहशत कायम आहे. मागील आठवड्यात सायंकाळच्या सुमारास बायपास रोडवर नव्याने होत असलेल्या टोल नाक्याजवळ दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मागील २०-२२ दिवसांपासून केडगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. २० दिवसांपूर्वी अंबिकानगर परिसरातून बिबट्याला मोठ्या महतप्रयासानंतर ताब्यात घेताना वनविभागाची दमछाक झाली होती. त्यानंतर मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास केडगाव निंबळक बायपास रोडवरील नेप्ती उपबाजार समिती जवळील उड्डाणपूल ते नव्याने झालेल्या टोलनाका परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूषणनगर, रात्र लिंक रोड परिसरातील गायके मळ्यातील विहीरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला होता. छान त्यानंतर पुन्हा नव्याने याच परिसरात दोन बिबटे दिसल्यामुळे या परिसरातील रहिवासी पुरते हादरले आहेत.

Post a Comment