राहुरी : येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांना पंधरा हजार रुपयांची लास घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
ज्ञानदेव गर्जे हे राहुरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. राहुरी येथील एका परवानाधारक दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराला मोठ्या गुन्ह्यात अडकून दारू विक्रीचा परवाना रद्द करण्याची धमकी देऊन दरमहा वीस हजार रुपये हप्ता ज्ञानदेव गर्जे यांनी मागितला होता.
मात्र तडजोड करून दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता देण्याची कबुली दारू विक्री करणाऱ्या दुकानातील कर्मचाऱ्याने केल्याने ज्ञानदेव गर्जे यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले आहे.
ज्ञानदेव नारायण गर्जे,स. पो. उपनि राहुरी पोलिस स्टेशन, अहमदनगर.राहणार – भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ अहमदनगर यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
.ही कामगिरी नाशिकचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस पोलिस नाईक संदीप हांडगे, पोलिस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे.
Post a Comment