पारनेर : भाजपचे खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या विरोधात कोण उभे राहणार ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके किंवा आमदार नीलेश लंके व सुजय विखे यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे भाजप सहउसाचे वातावरण होतेकाल ऐनवेळी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
त्यामुळे भाजप गटात काही कुशी काही गम असे वातावरण निर्माण झालेले आहे. विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे विरोधी गटातही हालचाली वेगवान सुरू झालेल्या आहेत.
आ. निलेश लंके यांची आज घरवापसी अंतिम झाली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके यांचा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंके उभे राहणार की राणी लंके उभे राहणार या विषयी चर्चा अंतिम झालेली नाही.
लंके यांनी विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीला उभे राहावे अशीच अपेक्षा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासह भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. भाजपच्यागटाकडून लंके यांना मदत केली जाण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.

Post a Comment