नगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अनेकजण निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
अहमदनगरमध्ये सध्या तसे बॅनर्स लागले असून यावर खासदार होणार असा उल्लेख करण्यात आला आहे. नीलेश लंके यांचेही फलक नगर जिल्ह्यात लागलेले आहेत. विशेष करून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके व राणी लंके यांचे फ्लेक्स मोठया प्रमाणात लागले आहेत.
भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर लंके यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

Post a Comment