नेवासा : मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे', असा मंगळवारी (ता. १२) रात्री साडेआठच्या सुमारास आईला मेसेज करीत एका तरुणाने प्रवरासंगम येथे पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून जीवन संपविले.
छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगर येथे एका खासगी कंपनीमध्ये ओमचे वडील चालक आहेत. वडील, आई, लहान भाऊ यांच्यासह ओम मोरे हा बजाजनगर येथे वास्तव्यास होता. ओम मोरे याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आईच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून जीवन संपवत असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने प्रवरासंगम येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली. रात्री आईने मेसेज पाहिल्यानंतर ओमचा शोध सुरू झाला.
दरम्यान, त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले. तपास केला असता, ओमची दुचाकी प्रवरासंगम गोदावरी पुलावर मिळून आली.

Post a Comment